भारत-चीन सहभागातून तयार झालेला रामगोपाल वर्मा यांचा ‘लडकी’ १५ जुलै रोजी प्रदर्शित होणार -८ मिनिटांचा भव्य आणि अनोखा ट्रेलर यूट्यूबवर प्रदर्शित

रामगोपाल वर्मा यांनी महिला शक्तीला प्रणाम करणारा ‘लडकी’ चित्रपट तयार केला होता. खरे तर हा चित्रपट पूर्वीच प्रदर्शित होणार होता. पण कोरोनामुळे चित्रपटाचे प्रदर्शन होऊ शकले नाही. मात्र आता रामगोपाल वर्माचा हा महत्वाकांक्षी चित्रपट १५ जुलै रोजी जगभरातील थिएटरमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. या चित्रपटाचा अनोखा आणि भव्य ट्रेलर शुक्रवारी यूट्यूबवर प्रदर्शित करण्यात आला.

‘लडकी’ हा चित्रपट मार्शल आर्टिस्ट असलेली अभिनेत्री पूजा भालेकरची ओळख करून देणारा इंडो चायनीज निर्मिती असलेला चित्रपट आहे. पूजा भालेकर ब्रूस लीने स्थापन केलेल्या फाइटिंग आर्ट जीत कुन दो या कलेमध्ये माहिर आहे.

तायक्वांदोमध्ये तज्ञ असलेल्या पूजाने अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतलेला आहे. पूजाने ‘लडकी’मधील तिच्या भूमिकेसाठी जीत कुन दो चे कठोर प्रशिक्षण घेतले आहे.

‘लडकी’ हा चित्रपट एकाच दिवशी म्हणजे १५ जुलै रोजी चीन आणि भारतात प्रदर्शित केला जाणार आहे. चीन आणि भारतात एकाच दिवशी प्रदर्शित होणारा हा पहिलाच चित्रपट आहे.

‘लडकी’च्या प्रमोशनसाठी तयार करण्यात आलेला ट्रेलर हा ८ मिनिटांचा क्लटर ब्रेकिंग एक्सटेंडेड ट्रेलर आहे, चित्रपटाची माहिती विस्तृतपणे दाखवणारा हा पहिलाच ट्रेलर आहे. जगातील फिचर फिल्मचा आतापर्यंतचा सर्वात मोठा ट्रेलर ‘लडकी’चा आहे.

‘लडकी’ चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत माहिती देताना रामगोपाल वर्माने सांगितले, ”मला माझ्या या चित्रपटाचा ट्रेलर घाईघाईत आणि कट्सच्या बीट टू डेथ फॉरमॅटमध्ये प्रदर्शित करायचा नव्हता, तर प्रेक्षकांना चित्रपटाच्या भावनिक आशयात खेचून घेणारा असा तयार करायचा होता आणि त्यासाठी मला पुरेसा वेळ द्यायचा होता. ‘लडकी’ हा केवळ एक मार्शल आर्ट अ‍ॅक्शन चित्रपट नसून एक मुलगी, तिचा प्रियकर आणि ब्रूस ली यांच्यातील अनोखा प्रेम त्रिकोण दाखवणारा चित्रपट आहे. आणि प्रेक्षकांना हे समजून घेतले पाहिजे असे मला वाटत होते.”

आठ मिनिटांपेक्षा जास्त लांबीचा हा विशेष ट्रेलर ही एक दुर्मिळ घटना आहे. कारण यापूर्वी इतका मोठा ट्रेलर कोणीही, कधीही प्रदर्शित केलेला नाही.

‘लडकी’ ची निर्मिती Artsee Media द्वारे करण्यात आली आहे. राम गोपाल वर्मा दिग्दर्शित या चित्रपटात पूजा भालेकर, पार्थ सुरी, राजपाल यादव आणि अभिमन्यू सिंग यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. १५ जुलै रोजी चीनसह जगभरात २५ हजारहून अधिक स्क्रीनवर चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे.

https://twitter.com/RGVzoomin/status/1535223063822086145

भारत-चीन सहभागातून तयार झालेला रामगोपाल वर्मा यांचा ‘लडकी’ १५ जुलै रोजी प्रदर्शित होणार -८ मिनिटांचा भव्य आणि अनोखा ट्रेलर यूट्यूबवर प्रदर्शित

Print Friendly, PDF & Email